महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, सेटिंग करून पैसे कमवण्यासाठी कुणालाही निवडणुकीची (election)तिकीट दिली जाणार नाही. गोंदियामध्ये आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या १९ वर्षांत गोंदिया जिल्ह्यात मनसेची यंत्रणा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली नाही. त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना पुढील दोन महिन्यांत आपली संघटना जिल्हाध्यक्षांपासून गटाध्यक्षांपर्यंत कार्यक्षमपणे कार्यरत करण्याची गरज व्यक्त केली.
राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण विचकले आहे, आणि या राज्यातील शासन व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांवर प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, त्यामुळेच राज्यात पश्चिम बंगालसारख्या गंभीर घटना घडत आहेत.
मनसेचे विचार गावोगावी, घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मनसैनिकाला सज्ज होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे, तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता वेळ कमी असून जास्त गतीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा:
रत्नागिरीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे भाजपची पाठ; महायुतीत तणाव वाढला
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची साथ: शिवराज सिंह चौहान
वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार