बदलापूरचं आक्रंदन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे नामांकित शिक्षण संस्थेतील बालवाडी मधील(cry) दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांने अत्याचार केल्याचा घृणास्पद, मानव त्याला काळीमा फासणारा प्रकार घडल्यानंतर बदलापूर मध्ये त्याच्या अति संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हे छोटे शहर दंगलग्रस्त बनले. दगडफेक , लाठीमार असे प्रकार झाले. तब्बल आठ तास सुरू असलेले रेल रोको आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून मोडून काढले.

चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आमच्यासमोर फासावर लटकवा ही कधीही मान्य न होणारी मागणी करून हजारो तरुण आणि तरुणींनी हे आंदोलन आठ तास तापवत ठेवले(cry) होते. हे आंदोलन सुरू असताना काही नेत्यांनी त्यात राजकारण आणले. या संवेदनशील प्रकरणाचे राजकीय भांडवल व्हावे हे दुर्दैवी आहेच शिवाय या निमित्ताने काही राजकारण्यांचे वैचारिक दारिद्र्यही समोर आले आहे.

बदलापूरची सर्वसामान्य जनता प्रक्षुब्ध व्हावी, तिने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे याला पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. पोलिसांनी संबंधित चिमुकल्या मुलींच्या पालकांची फिर्याद दाखल करून घेण्यास तब्बल 11 तासांचा विलंब केला. ही माहिती समोर आल्यानंतर सामान्य माणूस संतप्त होणारच. त्याचेच पडसाद मंगळवारी बदलापूर मध्ये उमटले. तीन ते चार वर्षे वयाच्या दोन मुलींवर शाळेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांने अत्याचार केले ही घटनाच हृदयाला पिळ पाडणारी आहे.

आता त्या आरोपी विरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होईल, विशेष तपास पथकाकडून त्याचा तपास होईल, द्रुतगती न्यायालयात खटला चालेल. कठोरातील कठोर शिक्षा होईल इतका भक्कम पुरावा तपास यंत्रणेने न्यायालयात दाखल करणे गरजेचे आहे. ही सर्व काही प्रक्रिया होईल पण अशी घटना नामांकित शाळेत घडते हेच चिंताजनक आहे.
संबंधित शिक्षण संस्थेने मुख्याध्यापिकेसह चार महिला कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह काहीजणांना निलंबित केले आहे.

लोकांच्या मनातील संतप्त भावना कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या निमित्ताने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी आलेल्यांना काय वागणूक मिळते याचे सुद्धा दर्शन घडले आहे. मुलींच्या वर अत्याचार झालेले आहेत अशी फिर्याद घेऊन आलेल्यांना तब्बल 11 तास ताटकळत ठेवले जाते हा प्रकारच भयानक आहे. राज्य महिला आयोगाने तसेच राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून बाल हक्क आयोगाचे एक पथक शाळेला भेट देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही या घटनेची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेया आहेत.

या घटनेचा निषेध करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शिक्षण (cry)संस्था ही भाजपची आहे, हे अधोरेखित करून सांगण्याची काही गरज नव्हती. खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, संजय राऊत या राजकीय मंडळींनी राज्य शासनावर टीकेची झोड उठवली आहे. या घटनेचे कोणीही राजकीय भांडवल करू नये किंवा राजकारण त्यामध्ये आणू नये असे आवर्जून सांगताना या मंडळींनी या घटनेला राज्य शासन कसे जबाबदार आहे, याचे एक प्रकारचे विश्लेषण केले आहे. वास्तविक अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. आता प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे.
बदलापूर येथे अमानुष प्रकार घडल्यानंतर आणखी काही शहरांमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

बदलापूरच्या त्या शिक्षण संस्थेने थोडीशी काळजी घेतली असती तर चिमुकल्यांवर अत्याचार झाला नसता. बालवाडीचा कारभार महिलांच्याकडेच दिला असता, केअर टेकर म्हणून महिलांनाच नेमले असते तर ही घटना टाळता आली असती. त्यामुळे या घटनेला शिक्षण संस्था ही जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्या शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा:

आज संकष्ट चतुर्थी: चंद्रपूजनासह व्रत पूर्ण करण्याच्या वेळा आणि विधींची माहिती

रोहित शर्माचे अभूतपूर्व विक्रम: दुसऱ्या जन्मातही मोडण्याची शक्यता कमी!

उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल; ‘प्रार्थना करा’ कॅप्शनने उडवले सोशल मीडियावर चर्चेचा धुमाकूळ