येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीची(z plus) घोषणा करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी मोदी सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोदी सरकारने मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे(z plus) अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या 55 सशस्त्र जवानांची टीम असणार आहे. माहितीनुसार, शरद पवार यांना आता झेड प्लस श्रेणीतील केंद्रीय राखीव पोलीस दल सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा प्रदान करणार आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं आहे आणि येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे त्यामुळे सरकारकडून शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय एजन्सींना मिळालेल्या माहितीनंतर सरकारने शरद पवार यांना सर्वोच्च दर्जाच्या सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने घेतल्या या निर्णयानंतर आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या 55 सशस्त्र जवानांची टीम नियुक्त करण्यात येणार आहे. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, झेड प्लस श्रेणीतील सुरक्षेमध्ये 10 सशस्त्र स्टँडिंग जवान, 6 पीएसओ राऊंड द क्लाॅक, 2 एस्कॉर्टमध्ये 24 जवान, 2 शिफ्टमध्ये 5 वॉचर्स, एक पोलीस निरीक्षक किंवा दोन उपनिरीक्षक प्रभारी म्हणून नियुक्त असतात. तसेच झेड प्लस श्रेणीत येणाऱ्या लोकांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सहा फ्रीस्किंग आणि स्क्रीनिंगकरण्यासाठी जवान तैनात असतात. यासह सहा ड्राइवर देखील चोवीस तास उपलब्ध असतात.
माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय निवडणुक आयोग राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आठ जागांवर विजय मिळवला होता.
हेही वाचा:
बदलापूरचं आक्रंदन!
आज संकष्ट चतुर्थी: चंद्रपूजनासह व्रत पूर्ण करण्याच्या वेळा आणि विधींची माहिती
उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल; ‘प्रार्थना करा’ कॅप्शनने उडवले सोशल मीडियावर चर्चेचा धुमाकूळ