तुम्हीही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या(Good news) फायद्याचीआहे. एनडीए सरकार योजनेच्या 55 कोटी लाभार्थ्यांसाठी एक मोठी योजना राबवणार असल्याची माहिती समोर आलीआहे. आयुष्मान भारत योजने अंतर्गत विमा संरक्षण 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे. याशिवाय महिलांसाठी हे कव्हर तब्बल 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
सरकार या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये चार लाख खाटा(Good news) वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कमिटीने पुढील पाच वर्षांचे लक्ष्य आणि ते साध्य करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यासाठी काम देखील केले आहे. या गटाच्या अहवालात महत्त्वाच्या मुद्यांची यादी देण्यात आली आहे.
आरोग्य, आयुष, क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण अशा नऊ मंत्रालयांचा समावेश असलेला हा गट लवकरच कॅबिनेट सचिवांसमोर सादरीकरण करणार आहे. आयुष्मान भारत योजना ही सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. ही जगातील सर्वात मोठी योजना आहे.
सरकारच्या योजनेअंतर्गत सुमारे 55 कोटी लाभार्थींच्या 12.34 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक आरोग्य कवच प्रदान केले जाते. ही सर्व कुटुंबे देशाच्या 40% लोकसंख्येमध्ये येतात. या योजनेंतर्गत 30 जूनपर्यंत 7.37 कोटी लोकांना रुग्णालयात या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच यावर एकूण एक लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे एनडीए सरकारची ही योजना यशस्वी झाल्याचा दावा भाजप करत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या जाहीरनाम्यात 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. याशिवाय विविध सरकारी अधिकाऱ्यांच्या गटांना भाजपच्या ‘संकल्प पत्राच्या आधारे लक्ष्य निश्चित करण्याचे आणि त्यानुसार कालमर्यादा निश्चित करण्याचे काम देण्यात आले आहे.
तसेच ‘ग्रेटर ऍक्सेस अँड पार्टिसिपेशन’ या थीम अंतर्गत आरोग्य मंत्रालयाच्या प्रमुख मुद्द्यांनुसार वार्षिक विमा संरक्षण मर्यादा प्रति कुटुंब 10 लाख रुपये वाढवणे हे लक्ष्यांपैकी एक आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत ‘विशिष्ट रोग आणि विशिष्ट परिस्थिती’च्या बाबतीत महिलांसाठी हे कव्हरेज 15 लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते.
हेही वाचा:
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
प्रभासला मोठा धक्का! प्रदर्शित होताच ऑनलाइन लीक झाला ‘कल्की 2898 एडी’
“नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं अन् माझ्यावर…”; अर्धनग्न अवस्थेत रस्त्यात बसून महिलेनं फोडला टाहो video