शिक्षकाचे धक्कादायक कृत्य! चिमुकल्या विद्यार्थिनीला कानातून रक्त येईपर्यंत मारलं, Video

आपल्याकडे गुरु-शिष्याच्या नात्याचा फार महत्त्व दिले गेले जाते. असे म्हणतात की, शिक्षक(teacher) आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो. आयुष्याचे धडे आपण आपल्या शिक्षकांकडून घेत असतो. आपल्या चुका ओळखून त्या सुधारण्यास आणि आयुष्याच्या चांगल्या वाटेवर जाण्यास शिक्षक आपल्याला आपली मदत करत असतात. अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यापेक्षा शिक्षेचा मार्ग निवडतात.

मात्र या शिक्षा कधी जीवघेण्या ठरतील याचा काय नेम नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना तेलंगणातील शाळेत घडली आहे. इथे शिक्षकाने आपली विद्यार्थिनीला इतके मारले की तुच्या कानातून अक्षरशः रक्त निघू लागले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

तेलंगणातील जगतियाल येथे एका विद्यार्थिनीला शाळेत गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे क्रूर शिक्षा देण्यात आली. इथे शिक्षकाने (teacher) इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या कानावर एवढा जोरात मारले की, तिच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. सदर घटना तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील जगतियाल ब्लॉकमध्ये असलेल्या एमपीपीएस टीआर नगर शाळेत घडली आहे. माहितीनुसार, ही शाळा एका स्थानिक संस्थेद्वारे चालवली जाते आणि ती ग्रामीण भागात आहे.

या सरकारी शाळेतील शिक्षकानचे नाव कुमार असून त्याने गृहपाठ न केल्याने आपल्या चिमुकल्या मुलीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल ,मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलीच्या कानावर मारल्यामुळे तिच्या कानातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि हे रक्त तिच्या पुस्तकावर पडलं.

शिक्षकानं केलेल्या अमानुष मारहाणीमुळे गंभीर दुखापत झालेल्या मुलीचा कानही दुसऱ्या शिक्षकाने व्हायरल व्हिडिओत दाखवला आहे. तसेच मुलीच्या कपड्यावर आणि आयडी कार्डवरही रक्ताचे डाग होते, जे शाळेतील दुसऱ्या शिक्षकाने या व्हिडीओमध्ये दाखवले.

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @Telugu Scribe नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शाळेत खळबळ उडाली आहे. तसेच आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर लोक शिक्षकाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी असे नेटकऱ्यांचे मत आहे. या प्रकरणी शिक्षकावर कोणतीही कारवाई झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.

हेही वाचा:

शरद पवारांना कोण मारणार? भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक टोला

55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोठी आर्थिक मदत

राज्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार; तरूणांसाठी CM शिंदेंनी खुलं केलं जर्मनीचं ‘द्वार’