चांद्रयान-३च्या प्रग्यान रोव्हरने उलगडली चंद्राची रहस्यमय उत्पत्ती: लाव्हारसाचा महासागर होता अस्तित्वात?

भारतीय अंतराळ (space)संशोधन संस्था (इस्रो)ची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान-३’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी अवतरण करून भारताने अंतराळ संशोधनात नवा इतिहास रचला. या मोहिमेच्या प्रग्यान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे सखोल विश्लेषण करत एक मोठा वैज्ञानिक शोध लावला आहे. प्रग्यानने दिलेल्या डेटाने चंद्राच्या उत्पत्तीविषयी महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे, ज्यात चंद्राच्या पृष्ठभागावर एकेकाळी लाव्हारसाचा महासागर अस्तित्वात होता, असे सूचित होते.

चांद्रयान-३च्या मोहिमेतून काय समजले?
‘चांद्रयान-३’च्या प्रग्यान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मातीचे विश्लेषण करत लाव्हारसाच्या (लूनर मॅग्मा ओशियन) सिद्धांताला बळकटी दिली आहे. या सिद्धांतानुसार, चंद्रावर एकेकाळी उष्ण आणि लिक्विड लाव्हारसाचा महासागर होता, जो हळूहळू थंड झाला आणि त्यातून चंद्राच्या पृष्ठभागाचे विविध स्तर तयार झाले. प्रग्यान रोव्हरने यशस्वीपणे चंद्राच्या मातीतील मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, आणि अन्य धातूंचा शोध लावला आहे, ज्यामुळे चंद्राच्या भूगर्भीय इतिहासाची नवीन ओळख मिळाली आहे.

इस्रोच्या या शोधाचे महत्त्व
चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या सखोल विश्लेषणाने चंद्राच्या उत्पत्तीची आणि त्याच्या भूगर्भीय संरचनेची माहिती मिळवण्यास मदत होते. हा डेटा चंद्राच्या भूगर्भीय प्रक्रियांचे आणि त्याच्या पृष्ठभागाच्या बदलांचे महत्त्वाचे रहस्य उलगडतो. ‘चांद्रयान-३’च्या या यशस्वी मोहिमेमुळे भारताने जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात आपले ठोस स्थान निर्माण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक मोहिमेच्या यशस्वी अवतरणाचा दिवस, २३ ऑगस्ट, ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ‘चांद्रयान-३’ची ही मोहिम भारताच्या अंतराळ संशोधनाच्या क्षमतांचा अभूतपूर्व दाखला आहे.

हेही वाचा:

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक: “४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र कोरा करणार”

कायदा क्षेत्रातील ‘या’ पर्याय – विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली

शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ दाखवून धमकावल्याचा आरोप