मुख्यमंत्र्यांच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत अंशतः रद्द अर्ज सुधारण्याची अंतिम संधी

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील ९२९४ अर्ज अंशतः रद्द करण्यात आले आहेत. या अर्जांची त्रुटी सुधारण्याची अंतिम संधी असून संबंधितांनी तातडीने योग्य दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. त्रुटी पूर्तता करून अर्ज ऑनलाईन पुन्हा सबमिट (submit)करणे प्रलंबित आहे, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत नारीशक्ती दूत मोबाईल अॅपवरून अर्ज सादर केलेल्या सर्व महिला, बचत गट अध्यक्ष, सचिव, गृहणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका इत्यादींना अपील करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये लॉगिन करून अर्जातील स्थिती तपासावी. अर्जाच्या स्थितीत “Approved”, “Disapproved”, “Pending”, “Rejected” इत्यादी माहिती उपलब्ध आहे.

अशा अर्जांमध्ये Disapproved असलेल्या अर्जाच्या कारणांची माहिती “View Reason” टॅबवरून मिळवू शकता. त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून “Edit Form” टॅबवर जाऊन योग्य दुरुस्त्या कराव्या लागतील. यानंतर अर्ज पुन्हा सबमिट करणे आवश्यक आहे. अर्ज एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्या, असे मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधितांनी तातडीने हे दुरुस्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तातडीने मिळवता येईल.

हेही वाचा:

चांद्रयान-३च्या प्रग्यान रोव्हरने उलगडली चंद्राची रहस्यमय उत्पत्ती: लाव्हारसाचा महासागर होता अस्तित्वात?

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक: “४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र कोरा करणार”

कायदा क्षेत्रातील ‘या’ पर्याय – विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली