महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

महाराष्ट्र: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (rain)फटका बसणार आहे. हवामान विभागाने 23 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोकण, गोवा, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील काही दिवस जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पालघर, मुंबई, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गसाठी 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट दिला आहे. ठाणे जिल्ह्यात 23 आणि 24 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट असून 25 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्याला 24 आणि 25 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, आणि गोंदिया जिल्ह्यात 24 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील पावसामुळे शेतकरी वर्ग, दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय अवलंबावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत अंशतः रद्द अर्ज सुधारण्याची अंतिम संधी

चांद्रयान-३च्या प्रग्यान रोव्हरने उलगडली चंद्राची रहस्यमय उत्पत्ती: लाव्हारसाचा महासागर होता अस्तित्वात?

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक: “४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र कोरा करणार”