कोल्हापूर : महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी आणि बांगलादेशातील हिंदूंवर(today’s news) होणाऱ्या अन्यायाविरोधात आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या बंदला शिवसेना शिंदे गटासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सकल हिंदू समाजातर्फे आज सकाळी 10 ते 5 या वेळेत कडकडीत कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. बांगलादेशातील हिंदू मंदिरे आणि हिंदू नागरिकांवर होत असलेले अत्याचार, कोलकाता येथील डॉक्टर महिलेची हत्या, तसेच निष्पाप मुलींचा क्रूर पद्धतीने लव्ह जिहादी बळी, संत-महंत रामनाथ गिरी यांच्या विरोधात आंदोलनावेळी केलेली शिवीगाळ याविरोधात सकल हिंदू समाजाकडून बंद आंदोलन पुकारले आहे.
या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळता रिक्षांसह(today’s news) सर्व व्यावसायिक बंधू, तसेच शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवरायांची महाआरती करण्यात येणार आहेत. या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, बदलापूरनंतर कोल्हापुरातील शियेमध्येही चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. शिये येथे 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ निषेधार्थ आज शिये गाव बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलेल्या महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्याची मालिका सुरूच आहे. महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध मुंबईतील वांद्रेमधील निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर परभणीतील पाथरी पोलीस ठाण्यामध्येही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांनी याबाबत आपली बाजू स्पष्ट केली. मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
जेथे अशी मानसिकता असते तेथे “व्यवस्था” नांदत नसते!
बदलापूरात शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या लेकी बाळींसाठी उद्या महाराष्ट्र बंद
मनसेच्या बैठकीत गोंधळ; उमेदवारीच्या निर्णयावर हाणामारी, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर वाद चिघळला