पाटस : दौंड तालुक्यातील गेलेला अष्टविनायक महामार्ग सध्या मृत्युचा(container) सापळा बनला आहे. मोरगाव ते सिद्धटेक या अष्टविनायक मार्गावरील पाटस ते दौंड रस्त्यावर सातत्याने जीवघेणे अपघातांच्या घटना घडत आहेत. बुधवारी (दि.21) रात्री आठ वाजण्याच्या आसपास पाटस हद्दीतील अंबिकनगर येथे पाटस बाजूकडून दौंड बाजूकडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहतूक कंटेनर रस्त्यालगत असलेल्या घरात घुसला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, लहान बाळासह दहा जण थोडक्यात बचावले आहेत.
अपघाताच्या घटनेनंतर अंबिकानगर(container)परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत काही क्षणात पाटस ते दौंड रस्ता रोखून धरला. तब्बल अडीच ते तीन तास रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. अंबिकानगर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्यात यावे. या ठिकाणी दोन्ही बाजूला सांकेतिक चिन्हांचे फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थ मागील काही दिवसांपासून करत आहेत.
या संदर्भात दौंड तहसीलदार, दौंड सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अष्टविनायक रस्ता प्रशासन आणि यवत पोलिसांना मागणीचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र, या संदर्भात अष्टविनायक रस्ता प्रशासनाने आज, उद्या करत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी केला. घटनास्थळी यवत आणि पाटस पोलिसांनी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत ग्रामस्थांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना या ठिकाणी गतिरोधक बसावण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी तात्पुरते रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. दोन दिवसात या ठिकाणी गतिरोधक न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
ग्रामस्थांच्या रास्ता रोकोमुळे पाटस ते दौंड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दौंड आणि नगरला जाणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अडीच-तीन तासाने पुन्हा वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.
हेही वाचा:
आज कोल्हापूर बंदची हाक…
जेथे अशी मानसिकता असते तेथे “व्यवस्था” नांदत नसते!
चाहत्यांना धक्का, सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय