पुणे : राज्यामध्ये सध्या मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण(driver) झाला आहे. बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थीनीवरील अत्याचाराचा प्रकरण ताजे असताना पुण्यात देखील संतापजनक प्रकार घडला आहे. शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेबाबत साशंकता आहे.
शाळेतील विद्यार्थीनीला तिच्या स्कूल व्हॅन ड्रायव्हरने(driver) तू मला आवडतेस असा मेसेज केला आहे. या प्रकरामुळे पालकांनी रोष व्यक्त केला असून मनसेने देखील चालकाला चोप दिला आहे.
राज्यामध्ये मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सध्या बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना पुणे, मुंबईमधील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला ‘तू मला आवडतेस’ असे मेसेज केले होते.
इन्स्टाग्रामवर वाहन चालकाने विद्यार्थींनीला हे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावर मेसेज करत सातत्याने विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी रोष व्यक्त करत या प्रवृत्तीबाबत संताप व्यक्त केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर मनसैनिकांनी त्या वाहन चालकाला चोप दिला आहे.
पुण्यातील या संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. त्यानंतर मनसैनिकांनी स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थींनी बाबत या घटना समोर येत असल्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत आहे. मुलींना शाळेत सुद्धा सुरक्षित पाठवता येत नसल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत.
पुण्यामध्ये स्वातंत्र्यदिनी विद्यार्थींनीला दारु पाजून तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आला. शाळेतील पीडित मुलगी आणि मुलांची ओळख होती. मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने व इतरांनी मुलीला फूस लावून मित्राच्या घरी पार्टीसाठी नेले. तेथे तिला दारु पाजली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. मित्राबरोबर असलेल्या एकाने मोबाइलवर याघटनेचा व्हिडीओ काढला. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
आज कोल्हापूर बंदची हाक…
चाहत्यांना धक्का, सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय
मालवाहतूक कंटेनर घुसला घरात; लहान बाळासह घरातील दहाजण…