गेल्या अनेक वर्षांपासून देशात पंतप्रधान आवास योजना(Good news) राबवली जाते. या योजनेचा लाखो लोकांना फायदा झाला आहे. नागरिकांना ग्रामीण किंवा शहरी भागात स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करते. या योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे.
या बदलामुळे पंतप्रधान आवास योजनेची(Good news) व्याप्ती आणखी वाढणार असून त्याचा लाखो लोकांना फायदा होईल. सरकारने ग्रामीण भागासाठी राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत काही बदल केले आहेत.या योजनेतील एका नियमामुळे अनेक अर्जदार अपात्र ठरवले जायचे.
मात्र, आता सरकारने या नियमात मोठा बदल केला आहे.या नवीन नियमानुसार आता, एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असेल तसेच त्याच्या घरी लँडलाईन फोन ,दुचाकी, फ्रीज असले तरीही त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. त्याला बाद ठरवले जाणार नाही. यापूर्वी अशा अर्जदारांना अपात्र घोषित केले जाई. आता मात्र, या नियमात बदल झाला आहे.
याआधी अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपये असले किंवा त्याच्या घरी दुचाकी असली की त्याला अपात्र ठरवले जायचे.मात्र, आता घरी फ्रीज, दुचाकी, लँडलाईन फोन असला तरी अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजनेची सुरुवात 2015 साली झाली. यामध्ये ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे देण्यात येतात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकूण एक लाख 20 हजार रुपये दिले जातात.
सदर रक्कम ही तीन टप्प्यात देण्यात येते. पहिल्या टप्प्यात एकूण 70 हजार रुपये दिले जातात. तर दुसऱ्या टप्प्यात 40 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 10 हजार रुपये दिले जातात.आता नुकताच या योजनेत बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
मालवाहतूक कंटेनर घुसला घरात; लहान बाळासह घरातील दहाजण…
चाहत्यांना धक्का, सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय
‘तू मला आवडतेस’ असा स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थीनीला मेसेज