इचलकरंजी: येथील बसस्थानकावर एसटी(st) बसमधून उतरताना एका महिलेच्या गळ्यातील पिशवीतून सोन्याचे गंठण असलेला बॉक्स चोरीला गेल्याची घटना बुधवारी (ता. 21) घडली. या चोरीमुळे सुमारे ६.३ तोळे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत अंदाजे १ लाख ९१ हजार ४७० रुपये आहे, लंपास झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहा प्रमोद पोळ (वय ३४, रा. डेक्कन मिल जवळ, इचलकरंजी) यांनी या चोरीची फिर्याद(st) दाखल केली आहे. पोळ या मिरज येथे माहेरी गेल्या होत्या आणि दुपारी इचलकरंजीकडे परत येताना बसमधून प्रवास करत होत्या. त्यांनी गळ्यात अडकवलेल्या पिशवीत सोन्याचे गंठण असलेला बॉक्स ठेवला होता.
दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी बसस्थानकावर उतरल्यावर, गळ्यातील पिशवीतून बॉक्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चार दिवसांत बसस्थानकावर सोन्याच्या दागिन्यांची ही दुसरी चोरीची घटना असून, या घटनांनी परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा:
प्रकाश आवाडेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा! तर्क वितर्क यांना उधाण…..
सांगलीतील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा
राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा जाणार संपावर