बदलापूरच्या बाल अत्याचार प्रकरणावरून काँग्रेस प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय(politics) वातावरण आणखीनच तापले आहे. शिंदे गटाने या विधानाचा तीव्र निषेध करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस प्रवक्त्याने एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान “जर मराठी माणसाने बदलापूरमध्ये बलात्कार केला तर त्यालाही तुम्ही वाचवणार का?” असे वक्तव्य केले होते. यावरून शिंदे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी काँग्रेसवर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल कनाल यांनी या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याला जातीय रंग देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न निंदनीय आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होते. काँग्रेसने आपल्या प्रवक्त्याला तात्काळ बडतर्फ करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा:
महाराष्ट्र बंद मागे घ्या; कोर्टाच्या आदेशानंतर पवारांचे आवाहन
इचलकरंजीत एसटीतून उतरताना सहा तोळ्याचा गंठणचा बॉक्स चोरीला….
सांगलीतील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा