इचलकरंजीत सागर चाळके यांचे आमदार प्रकाश आवाडेंना खुलं आव्हान

इचलकरंजी, 24 ऑगस्ट 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर इचलकरंजीत राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगरसेवक सागर चाळके यांनी आमदार प्रकाश आवाडेंच्या विकास कामांवर तीव्र टीका करत, त्यांना सार्वजनिकपणे खुलं आव्हान दिलं आहे.

सागर चाळके यांनी आरोप केला आहे की, आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणुका (election) डोळ्यासमोर ठेवून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी शहरातील बोअरवेल्सची रिपेअरिंग सुरू केली आहे. “गेल्या पाच वर्षांत एकही बोअर बंद पडलेला नाही, मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर स्वखर्चातून बोअर रिपेअरिंग करून दिलं जातंय,” असा आरोप चाळके यांनी केला आहे.

तसेच, “मीच इचलकरंजीला पाणी देणार” असे जाहीर करणाऱ्या आमदार आवाडेंनी शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यास अपयश आले असल्याचे चाळके यांनी स्पष्ट केले आहे. जलकुंभ बांधून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु या जलकुंभांमध्ये पाणी आणण्यासाठी कोणतीही योजना नाही, असे म्हणत चाळके यांनी प्रकाश आवाडेंना आमने-सामने येऊन आपली कामगिरी स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.

सागर चाळके यांचे हे आव्हान निवडणुकीपूर्वीचा (election) एक मोठा राजकीय मुद्दा बनू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

कल्याणमध्ये काँग्रेसला मोठे बळ, भाजपच्या माजी नेत्यासह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

विकासापासून खूप खूप दूर राजर्षी शाहूंचं कोल्हापूर…!

ऑफिसचं काम घरी आणायचंच नाही, बॉसचा फोन आला तर… घाबरू नका, आता कायदाच आलाय..