अरबाज खानचा मुलगा अरहान आणि सावत्र आईचा ‘तो’ VIDEO VIRAL! 

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे नेहमीच (VIRAL)चर्चेत असतो. अरबाजनं शूरा खानशी दुसरं लग्न केलं, तेव्हापासून सगळीकडे तो तिच्यासोबत स्पॉट झाल्याचे आपण पाहिले. शूरा खानचं अरबाजच्या कुटुंबासोबत खूप चांगंल बॉन्ड आहे. इतकंच नाही तर अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहानसोबत देखील खूप चांगलं बॉन्ड असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शुरा खान आणि अरहानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर(VIRAL) वरिंदर चावलानं शेअर केला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. जेव्हा शूरा ही कार जवळ जात होती तेव्हा अरहान कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसला. गाडीत शूरा ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली होती. या व्हिडीओला पापाराझी वरिंदर चावलानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

अरहान आणि शूरा जेव्हा एकत्र त्या ठिकाणाहुन बाहेर पडत असतात तेव्हा ते एकमेकांशी हसताना दिसतात. त्यानंतर अरहान कोणालातरी फोन करताना दिसतो आणि गाडीच्या दिशेनं जातो. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सावत्र आई आणि सावत्र मुलाच्या वयात काही खूप अंतर नाही.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘खरी आई कोणा दुसऱ्यासोबत सुट्टीचा आनंद घेते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सावत्र आई आणि सावत्र मुलाची बेस्ट जोडी.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अरहान आणि शूरा एकमेकांचा द्वेष करत नाहीत. कमीत कमी ते एकमेकांचा आदर करतात.’

शुरा खाननं अरबाज खानशी डिसेंबर 2023 मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न हे अरबाजची बहीण अर्पिता खानच्या घरी झालं होतं. त्यात अरहाननं देखील हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो अरबाजनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. तर अरबाज आणि मलायकाचं 1997 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या 20 वर्षानंतर 2017 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. मात्र, बऱ्याच काळापासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा:

त्यांचं सुरक्षित सत्ताकारण, कार्यकर्त्यांसाठी असुरक्षित!

रोज तुळशीच्या पानांची सेवन केल्याने शरीर आणि मनावर विविध प्रकारचे फायदे

विधानसभेपूर्वी भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का? बडा नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत!