नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेडमधील कॉँग्रेसचे(ambulance)खासदार वसंत चव्हाण यांचं आज (26 ऑगस्ट) सकाळी निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर हैद्राबाद येथे उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वसंत चव्हाण यांना काही (ambulance)दिवसांपूर्वी एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 13 ऑगस्टपासून हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्हा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
वसंत चव्हाण यांना राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली दिली आहे. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत वसंत चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.”खा.वसंतराव चव्हाण व आमचे दोन पिढ्यांचे संबंध होते.
आमच्या वडिलांनी एकत्र काम केले, आम्ही सुद्धा राजकारण व सहकार क्षेत्रात अनेक वर्ष सोबत राहिलो. नांदेडचे खासदार म्हणून त्यांना प्रथमच केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी लाभली होती. मात्र, त्यांच्या निधनाने ग्रामीण भागाची नाडी उत्तमपणे जाणणारे एक संयमी, विनम्र व अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत चव्हाण कॉँग्रेसकडून निवडणुकीत उतरले होते. त्यांनी भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत नांदेडची जागा काँग्रेसला मिळवून दिली. नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांचा विजय राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
हेही वाचा:
कोयना धरणक्षेत्रात पावसाने वार्षिक सरासरी नोंदवली; धरणसाठ्यात मोठी वाढ
दररोज सकाळी मिठाचे पाणी प्यायल्याचे फायदे: तज्ज्ञांच्या मते
महिलांसाठी ई-एफआयआरची सुविधा; पंतप्रधान मोदींचा महिलांच्या सुरक्षा संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय