देशातील एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यावर(minister) अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सीडी प्रकरणामुळे चर्चेत आलेले वकील जगदीश यांनी याबाबत दावा केला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांविरोधातील ‘सेक्स स्कँडल’बाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे.
वकील जगदीश यांनी सोशल मीडियावर(minister) याबाबत आरोप केला आहे. त्यांनी कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना थेट ‘सेक्स स्कँडल’मध्ये ओढले आहे. त्यांनी या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलं नाही. मात्र, त्यांनी केलेली ही पोस्ट आता तूफान व्हायरल होत आहे. लवकरच ते नावाचा देखील खुलासा करणार आहेत. यामुळे देशभर याचीच चर्चा रंगली आहे.
आपल्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सत्तेचा घोर गैरवापर उघड करत आहे. अन्न, घर, शिक्षण, पिण्याचे पाणी या मूलभूत गरजांसाठी 6.5 कोटी कन्नड नागरिक संघर्ष करत असताना, या माजी मुख्यमंत्र्यांनी करोडो कराचा पैसा त्यांच्या वैयक्तिक सुख-भोगांवर उधळला आहे. महागड्या भेटवस्तू, आलिशान गाड्या, महागडे व्हिला, हिऱ्यांचे हार, आंध्र प्रदेशातील अभिनेत्रींना प्रभावित करण्यासाठी चांदीचे इनरवेअर यावर पैसे खर्च करण्यात आले.
सार्वजनिक निधीचा हा उघड गैरवापर हा कर्नाटकातील प्रत्येक प्रामाणिक, कष्टाळू नागरिकाचा अपमान आहे. आपल्या नेत्यांना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एकजूट होऊया, असं ट्वीट वकील जगदीश यांनी केलं आहे. या ट्वीटने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, हा माजी मुख्यमंत्री सेक्स स्कँडलमध्ये देखील सामील होता. या रॅकेटमध्ये या माजी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यावेळचे अन्य दोन मंत्रीही सहभागी असल्याची माहिती आहे. ते मुख्यमंत्री असताना ते नंदीबेट्ट येथे गेले होते. त्यावेळी मुलींचा वापर करून माजी मुख्यमंत्र्यांना या रॅकेटमध्ये सहभागी करून दोन तत्कालीन मंत्री आणि 15 ते 20 अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे लाभ घेतल्याची माहिती आहे.
तसेच, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नंदीबेट्ट आणि इतर ठिकाणी घेऊन गेलेल्या लोकांनी व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याची देखील माहिती आहे. व्हिडीओमधील व्यक्तीची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे वकील जगदीश म्हणाले आहेत.
हेही वाचा:
लालपरीची चाके थांबणार! गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने
राजकीय भूकंप, भाजप-अजितदादा गटातील दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत