के.पी. जाणार “मातोश्री” वर हाती घेणार ठाकरेंची “मशाल”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण (political campaign)अस्थिर आहे. त्यामुळे राजकीय संदर्भ सतत बदलत असतात आणि संदर्भ बदलले की समीकरणे सुद्धा बदलतात. अशा वातावरणात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशी आयाराम आणि गयाराम प्रवृत्ती वाढते. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय मंचावर सध्या असेच घडताना दिसते आहे. पक्षनिष्ठा बाजूला ठेवून अनेक जण सत्तानिष्ठ बनतात.

हसन मुश्रीफ(political campaign) यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या के पी पाटील यांनीही हातात मशाल घेण्याचा निर्णय घेतला आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर विरुद्ध माजी आमदार के पी पाटील असा “सामना” विधानसभा निवडणुकीत रंगणार आहे. बिद्री साखर च्या पंचवार्षिक निवडणुकीत हसनमुस्लीफ हे के पी पाटील यांच्याबरोबर आणि प्रकाश अबिटकर यांच्या विरोधात होते. आता मुश्रीफ,अबिटकर हे महायुतीत एकत्र आहेत. आणि युती धर्म पाळण्यासाठी त्यांना विधानसभा निवडणुकीत अबिटकर यांना समर्थन द्यावे लागणार आहे. के पी पाटील यांना “मातोश्री” वरून भेटण्याचे निमंत्रण आल्याने त्यांचे मेहुणे ए वाय पाटील यांचा महाविकास आघाडीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे.

राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे कधी राधानगरी कडे तर कधी भुदरगडकडे विधानसभेचे प्रतिनिधित्व आले आहे. के पी पाटील हे 2004 आणि 2009 मध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर सलग दोन वेळा निवडून गेले होते. त्यांची हॅट्रिक प्रकाश आंबेडकर यांनी खंडित केली आहे. आणि आता अबिटकर यांना या मतदारसंघातून हॅट्रिक करावयाची आहे. के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. काल परवा त्यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली आहे.

आता हा मतदारसंघ एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. महायुतीचे उमेदवार प्रकाश अबिटकर हे असणार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे जाण्याचा एकमेव पर्याय के पी पाटील यांच्याकडे होता आणि आता तो त्यांनी स्वीकारला आहे. लवकरच ते मुंबईत मातोश्री वर जाऊन शिवबंधन बांधून घेणार आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे.

या मतदारसंघातून के पी यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील हे सुद्धा इच्छुक होते आणि आहेत. पण त्यांच्यासमोर मजबूत राजकीय पक्षाचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत किंवा नाहीत हे समजायला मार्ग नाही. राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत.

उद्धव ठाकरे हे निवडून येण्याची पात्रता असलेल्या उमेदवारांच्या(political campaign) शोधात होते. त्यांना प्रकाश अबिटकर यांचा पराभव करावयाचा आहे आणि म्हणूनच त्यांनी दोन वेळा आमदारकी भोगलेल्या के पी पाटील यांना भेटण्यासाठी बोलावले आहे. आमदारकी पासून सलग दहा वर्षे बाजूला असलेल्या के पी पाटील यांना पुन्हा विधानसभेवर जायचे आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याची नुकतीच झालेली निवडणूक ही त्यांच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम होती. ही निवडणूक त्यांनी जिंकली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात, त्यांना त्यांचे नेते हसन मुश्रीफ यांची साथ सोडावी लागली आहे. आणि आता ते या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत.

ए वाय पाटील हे सुद्धा महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनाही उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी हवी होती. तथापि दहा वर्षे आमदार असलेले आणि साखर कारखाना ताब्यात असलेले के पी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पसंती दिली आहे. निवडून येण्याची के पी पाटील यांची पात्रता पाहूनच ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे.

हेही वाचा:

‘या’ राज्याचे माजी मुख्यमंत्री ‘सेक्स स्कँडल’मध्ये सामील?, खळबळजनक दावा समोर

लालपरीची चाके थांबणार! गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने