मालवण: सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर (fort)अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, पुतळा आठ महिन्यांतच कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. एवढ्या कमी कालावधीत पुतळा कोसळतोच कसा? पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार असलेल्या पुतळ्याची तपासणी झाली होती का?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “पुतळे आणि स्मारकं ही फक्त राजकीय सोय राहिली आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि स्मारकांच्या निविदा काढून फायदा मिळवायचा इतकंच उरलं आहे. प्रतिकांचं राजकारण करणारी ही व्यवस्था लोकांनी आता उध्वस्त केली पाहिजे. तसं झालं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.”
राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सरकारकडून या घटनेवर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; अधिकृत घोषणा, प्रमाणपत्र प्रदान
मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यामागे ‘वातावरणीय परिस्थिती’ कारणीभूत – मुख्यमंत्री शिंदे
चिमुकलीवर अत्याचार प्रकरण: आरोपीला केवळ दोन दिवसांचा पोलिस कोठडी remand