एक पुतळा कोसळताना काही प्रश्न उभे राहतात!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मालवण नजीकच्या राजकोट परिसरात समुद्रकिनाऱ्यालगत (statue)आठ महिन्यापूर्वी अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी कोसळला. देशभर अनेक पूर्णाकृती पुतळे उभारण्याचा आले आहेत, ते अनेक राष्ट्र पुरुषांचे, समाज पुरुषांचे, साहित्यिकांचे, कलाकारांचे आहेत. त्यापैकी एकही पुतळा कोसळल्याची घटना घडलेली नाही. मालवण येथे उभारण्यात आलेला भव्य पुतळा त्याला दुर्दैवाने अपवाद ठरला आहे. तो कोसळल्यामुळे काही प्रश्न उभे राहिले आहेत. या घटनेच्या चौकशीतून त्याची उत्तरे मिळतील किंवा तशी अपेक्षा करायला हरकत नाही.

गतवर्षी मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात भारतीय नौदलाच्या वतीने(statue) दिनांक 4 डिसेंबर रोजी दिल्ली बाहेर प्रथमच नौदल दिन साजरा करण्यात आला होता. नौदल उभारणीचे जनक म्हणून छत्रपती शिवरायांकडे पाहिले जाते आणि म्हणूनच भारतीय नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्रा आणली गेली आहे. भारतीय लष्कर हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानते. म्हणूनच नौदल दिनाच्या निमित्ताने गेल्या वर्षी या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. पंधरा फूट उंचीचा चबुतरा, आणि त्यावर 28 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असे हे 43 फूट उंचीचे शिवस्मारक होते. तमाम भारतीयांची अस्मिता असलेला हा छत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना वेदनादायी आहे आणि त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त होऊ लागल्या आहेत.

पर्यावरणीय वातावरणामुळे, क्षार हवामानामुळे प्रतिकूल परिणाम होऊन हा पुतळा कोसळला असल्याचे प्राथमिक अनुमान काढण्याचा आले आहे पण ते फसवे आहे. तसे असेल तर खारे हवामान असलेल्या मुंबईसह अनेक शहरात पुतळे आहेत, त्या पुतळ्यांवर हवामानाचा प्रतिकूल परिणाम का झाला नाही? एकही पुतळा का कोसळला नाही? सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे पुतळे आहेत. त्यांच्यावर खाऱ्या हवामानाचा परिणाम का झाला नाही? अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या भव्य पुतळ्यावर तसा परिणाम का झाला नाही? आणि म्हणूनच मालवण राजकोट किल्ला परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाऱ्या हवामानामुळे कोसळला असे म्हणता येणार नाही. आणि हा पुतळा तर केवळ आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आला होता.

‌ कोणताही पुतळा किंवा शिल्प हे ब्रांच या धातूपासून किंवा गण मेटल, पंचधातूपासून बनवले जाते. हे पुतळे अखंडपणे बनवले जात नाहीत. कोणत्याही पुतळ्याचे काही भागात ओतकाम केले जाते. आणि नंतर हे सर्व भाग जोडले जातात. त्याचे जोड काम दिसू नये अशा पद्धतीने त्याचे ग्राइंडिंग केले जाते. पूर्णाकृती पुतळ्याचा गुरुत्व मध्य महत्त्वाचा असतो. कोल्हापुरात रणरागिनी छत्रपती ताराराणीचा अश्वारूढ पुतळा आहे. तू घोड्याच्या मागच्या दोन पायावर उभा आहे. छत्रपती ताराराणी च्या हातातील तलवारीचे टोक ते घोड्याचे शेपूट असा गुरुत्व मध्य या पुतळ्याचा आहे. त्यामुळे तो मागच्या दोन पायावर कितीतरी वर्षांपासून उभा आहे.

प्रख्यात शिल्पकार रवींद्र मिस्त्री यांनी बनवलेला छत्रपती ताराराणीचा घोड्याच्या दोन पायावर उभा असलेला देशातील पहिला पुतळा आहे. आता अशा प्रकारचे काही पुतळे काही शहरांमध्ये उभारण्यात आलेले आहेत. पुतळ्यासाठी कबुतरा अर्थात चौथरा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण त्यावरच पुतळे उभे केले जातात. म्हणूनच पुतळ्याच्या चौथर्‍याचा पाया किती भक्कम आहे त्यावर बरेचसे काही अवलंबून असते.

मालवणच्या राजकोट परिसरात समुद्रकिनाऱ्यालगत या भव्य(statue)पुतळ्यासाठी बांधण्यात आलेल्या चौथर्‍याचा पाया, भक्कम होता किंवा कसे हे सुद्धा पहावे लागेल. पुतळा तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला होता आणि त्याचे गेज किती होते म्हणजे त्या धातूची जाडी किती होती हे सुद्धा पहावे लागेल. आता त्याबद्दल संबंधित शिल्पकाराकडे चौकशी केली जाईल.

उभारण्यात आलेला चौथरा आणि त्यावरील 28 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समुद्र किनाऱ्यावरील वाऱ्याचा वेग, त्याची दिशा याचा अभ्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ अभियंत्यांनी केला असेलच. त्यामुळे पुतळा कोसळल्याच्या घटनेची त्यांच्यावरही जबाबदारी येते. आणि म्हणूनच शिवप्रेमींनी सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभागात घुसून मोडतोड करून निषेध व्यक्त केलेला असावा. एकूणच हा पुतळा केवळ आठ महिन्यात कसा काय कोसळला याची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. कारण या शिवस्मारकावर कितीतरी कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. खाऱ्या हवामानात उभा असलेले पुतळे इतर शहरातही आहेत, ते का कोसळले नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

हेही वाचा:

”त्याने मागून पकडलं, किस केलं”; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ, आणखी एक जीआर काढला