महाराष्ट्रात पावसाचा कहर: पुणे, रायगड ऑरेंज अलर्टवर; 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रासह देशभरात पावसाचा (rain)जोर वाढत चालला असून, हवामान खात्याने 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे, रायगड, आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह इतर उपनगरांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागांमध्येही दमदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील.

विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, गडचिरोली, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर असाच राहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. पावसामुळे पूरस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:

गौतमी पाटील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार? चर्चेच्या पार्श्वभूमीवर तिची प्रतिक्रिया

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल

दोन महिलांवर हल्ल्याचा प्रयत्न, सहकारनगर आणि कोढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल