सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर(fort) उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटेवर गंभीर आरोप केले आहेत.
मिटकरींनी आपटेवर “देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करण्याची” मागणी केली आहे. त्यांच्या मते, आपटेने या पुतळ्यात छत्रपतींच्या इतिहासाची प्रतारणा केली आहे.
मिटकरींच्या मते, आपटेने छत्रपतींच्या पुतळ्यात एक “छुपा अजेंडा” राबवला आहे, ज्यामुळे छत्रपतींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ एक खोच दाखवली गेली आहे. त्यांनी आपटेवर गंभीर आरोप करताना विचारले की, “शिवरायांच्या इतिहासाची अजून किती प्रतारणा करणार आहेत? यांची मळमळ अजून का गेली नाही?”
मिटकरींच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
बदाम दूधाचे फायदे काय? सकाळी की रात्री कधी पिणे अधिक फायदेशीर?
ICC Test Ranking: बाबर आझमला मोठा धक्का, कोहली-जयस्वालला मोठा फायदा
दीपक केसरकरांवर संजय राऊतांचा घणाघात: “अफजलखानाची औलाद, बुटांनी मारले पाहिजे”