‘बिग बॉस मराठी‘च्या पाचव्या पर्वात आता घरातले समीकरण पूर्णपणे बदलले आहे. पहिल्या दिवसापासून ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन ग्रुप तयार झाल्यानंतर, भाऊच्या धक्क्यावर रितेशने घेतलेल्या शाळेमुळे आणि निक्कीला तिच्याविषयी मागून काय-काय चुगल्या केल्या जातात याचे व्हिडीओमध्ये दाखवल्यामुळे घरातील वातावरण ताणलेले आहे. खासकरून जान्हवी, अरबाज, वैभव, आणि निक्की यांच्यातील मैत्रीमध्ये आता फूट पडली आहे.(Bigg Boss Marathi)
निक्की आणि अरबाजच्या भांडणामुळे अरबाज अस्वस्थ असल्याचे दिसून आले आहे. अरबाजला निक्की आणि अभिजीतची मैत्री आधीपासूनच खटकत होती, आणि ‘बिग बॉस’च्या जोड्यांच्या टास्कमध्ये निक्की-अभिजीतची जोडी तयार झाल्यावर या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. मंगळवारी (२७ ऑगस्ट) भागात हे भांडण थेट रिअलिटी शोच्या प्रेक्षकांना मोठ्या स्वरुपात पाहायला मिळाले.
अरबाजने किचनमध्ये भांडी फोडली आणि त्यानंतर बेडरूममध्ये आदळआपट केली. यामुळे त्याच्या कॅप्टन्सीपदाची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. या सर्व भांडणाचा परिणाम अरबाज आणि निक्कीच्या नात्यावर झाला आहे.
निक्कीने आपल्या भावनांचा उलगडा करताना अभिजीतसमोर ढसाढसा रडले. तिने सांगितले की, घरातील लोक अरबाजसोबत तिची मैत्री तोडण्यासाठी त्याला तिच्याशी बोलू देत नाहीत. ती म्हणाली, “माझ्यावर अन्याय होतोय. तो मुलगा एकटा खेळू शकत नाही. त्याच्यासोबत बोलण्याची माझी प्रचंड इच्छा आहे, पण घरातले लोक त्याला ते करायला थांबवत आहेत. त्याला मी खूप महत्त्वाची आहे, पण त्याने सगळं दाबून ठेवले आहे.”
निक्कीने अभिजीतसमोर आपले मन मोकळं करत, अरबाजसाठी केलेल्या sacrifices बद्दल दिलखुलासपणे बोलले. हे सर्व दृश्य ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांसाठी एकच खूप मोठा अनुभव ठरला.
हेही वाचा:
जयदीप आपटेच्या पुतळ्यावरून वादंग: अमोल मिटकरींचे गंभीर आरोप, “देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!”
बदाम दूधाचे फायदे काय? सकाळी की रात्री कधी पिणे अधिक फायदेशीर?
ICC Test Ranking: बाबर आझमला मोठा धक्का, कोहली-जयस्वालला मोठा फायदा