आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुती जोरदार(nationalists) तयारीला लागली आहे. नेत्यांच्या राज्य दौऱ्याला देखील सुरुवात झाली आहे. अशात महायुतीमधील अंतर्गत वाद आता उफळून आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत शिंदे गटाच्या नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे महायुतीमधील घटक पक्षाचा वाद आता समोर आला आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांने खळबळजनक विधान केले असून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमावेळी(nationalists) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल खळबळजनक विधान केलं. त्यांनी राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, असं म्हटलं आहे. यामुळे अजित पवार गट चांगलाच भडकला आहे.
“मी एक कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यात कधीच पटले नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्यासोबत कधीच पटले नाही. आम्ही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही.”, असं धक्कादायक विधान तानाजी सावंत यांनी केलं आहे.
तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणाले आहेत.
तानाजी सावंत यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरं, अशी नाराजी उमेश पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच, महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये असंही पाटील म्हणाले.
आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सावंत यांच्या वक्तव्यावर ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात , हाफकिन संस्थेला माणुस म्हणु शकतात,इतकंच काय आपला बुम ता. परंडा जि. धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलु शकतात.”, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर तानाजी सावंत यांची आणखी एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तानाजी सावंत हे धाराशिव लोकसभा बाबतीत बोलताना दिसत आहेत. “आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं. ज्याला आपण मतदान करत नव्हतो त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी मतदान करा असे म्हणायला तुमच्यापार्यंत आलो नाही. कारण आपल्यालाच पटलेलं नव्हतं” असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. मात्र, तानाजी सावंत यांची ही व्हायरल क्लिप नेमकी कधीची आहे याबाबतीत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सध्या ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा:
भारताच्या आणखी एका क्रिकेटरने खेळाला केला अलविदा!
आज लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशी होणार धनवान, सर्व अडचणीही दूर होणार!
स्ट्रक्टरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं, चौकशीतून पुतळ्याबाबत नवी माहिती समोर…