पुणे : बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकत कारवाई करून पुणे पोलिसांनी(political circles) माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथून तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट असा २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू होता.
कोंढव्यातील द व्हिलेज हॉटेलवर पोलिसांनी(political circles) ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता पुण्यातील अन्य काही हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आली आहेत. बाकीर रमेश बागवे (३६, रा. भवानी पेठ), हरून नबी शेख (२५), बिक्रम साधन शेख (२०), अमानत अन्वर मंडळ (२२), अमानत अन्वर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बाकीर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे.
कोंढवा भागातील व्हिलेज हॉटेलमध्ये अवैधरित्या नागरिकांना हुक्का पुरविला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस तपास करत आहेत. कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत 23 हजार 500 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच हुक्क्याचे फ्लेवर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉटही जप्त करण्यात आले आहेत.
हा संबंधित हुक्का पार्लर हा माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत होता. त्यामुळे त्यांच्या मुलासह 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरवला जात होता. याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा:
पोलीस कर्मचारी करत होते डान्स; तितक्यात वरिष्ठ अधिकरी आले अन्…Video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार ब्रेक? ‘Bye Bye MHJ, See You Soon…’
सप्टेंबरमध्ये करा बॅग पॅक! शिर्डी..अहमदाबाद..हरिद्वार.. सुरू होणार भारतीय रेल्वेचे ‘हे’ 3 टूर पॅकेज