मुंबई, ३१ ऑगस्ट: उद्या रविवार (sunday)दि. १ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त मुंबई शहर गणेशोत्सवाच्या उत्साहात बुडून जाणार आहे. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा गणपती अशा प्रसिद्ध मंडळांच्या गणपतींच्या आगमनाने मुंबईकर भक्तीच्या रंगात रंगणार आहेत.
या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली असून, ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे. मंडळांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा मुंबईकरांसाठी केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक ऐक्याचे आणि सांस्कृतिक उत्कर्षाचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरात एक वेगळाच उत्साह आणि उल्हास पाहायला मिळतो.
पोलीस प्रशासनानेही गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेच्या कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता यावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे
हेही वाचा:
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी दोघांना अटक, चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तयारी: माने यांची उमेदवारी निश्चित
सूचना तशी चांगली, पण सर्वांनीच वेशीला टांगली!