आई-बाबा झाले अंकिता-विकी! VIDEO शेअर करत दाखवला चेहरा

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैनच्या घरी एका नव्या पाहुण्याचा(VIDEO) आगमण झालं आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी एका राजकुमारीचे स्वागत केले आहे. त्यासंबंधीत एक व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिता लोखंडे आणि विकी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनं सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत(VIDEO) सुरुवातीला विकी जैन हा लिफ्टच्या इथे असल्याचे पाहायला मिळत आहे. तो देखील उत्साहानं लिफ्टकडे पाहत असतो. त्यानंतर तिथून एक व्यक्ती त्याच्या हातात एक छोटी टोपली घेऊन येतो. त्यात एक छोटी मांजर आहे. त्यात अंकिता आणि विकी दोघेही त्या मांजरीशी खेळताना दिसत आहेत.

तर हा व्हिडीओ शेअर करत अंकितानं कॅप्शन दिलं की आमच्या कुटुंबात तुझं स्वागत, आमची छोटी राजकुमारी म्यू लोखंडे जैन. आज आमच्या कुटुंबात सगळ्यात नवीन सदस्य आली आहे. आई आणि वडील तुझ्यावर खूप प्रेम करतात. आज आमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन आली आहेस.

पुढे अंकिता म्हणाली, ‘तुझ्या येण्यानं आमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम भरून आलंय. आमच्या छोट्याशा मुलीसाठी खूप प्रेम आणि नेहमी आठवणीत राहतील असे क्षण. तुला आधीपासून खूप लाड आणि प्रेम मिळत आहे. आमची प्रिय लेक. तुझ्या या छोट्या पावलांनी आणि कडल्सनं आमचं मन जिंकलं आहे. आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे. ‘ त्यांनी यातून दाखवलं आहे की त्यांनी मांजर दत्तक घेतली असून ती त्यांच्या मुलीच्या जागी आहे. तर अंकिता तिला फिश टॉय दाखवताना दिसली.

अंकितानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यावर शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘खूप खूप शुभेच्छा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ती खूप गोंडस आहे असं काहींचं म्हणणं आहे.’ तर आणखी एका नेटकऱ्यानी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा:

भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!

कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन् कार थेट नदीत

CSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा…