परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी अवघ्या १४ वर्षांची असून ती ग्रामीण भागातून खासगी शिकवणीसाठी गंगाखेड शहरात येत होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे (police)दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. मुलगी शिकवणीसाठी जात असताना वाटेत तिच्यावर हा अत्याचार झाला. घटनेनंतर मुलगी घाबरून घरी गेली आणि आपल्या आईवडिलांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले.
आईवडिलांनी तात्काळ गंगाखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पीडित मुलीचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा:
आई-बाबा झाले अंकिता-विकी! VIDEO शेअर करत दाखवला चेहरा
भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!
कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन् कार थेट नदीत