इचलकरंजीत भाजपचा आक्रमक निषेध: छत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानावर महाविकास आघाडीला फटकारले

इचलकरंजीमध्ये भाजपने महात्मा गांधी चौकात महाविकास आघाडीच्या विरोधात(about chhatrapati shivaji) तीव्र निषेध आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अपमानानंतर आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनंतर महाविकास आघाडीचे नेते राजकारण करीत असल्याच्या आरोपावरून भाजपने हे आंदोलन छेडले.

आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आणि वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज(about chhatrapati shivaji) की जय, जय भवानी अशा घोषणांनी महात्मा गांधी चौक दणाणून गेले. भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक म्हणाले की, राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकारण करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली त्यानंतर देखील विरोधक राजकारण करत आहेत. शिवप्रेम विरोधकांनी दाखवण्याची गरज नाही. गड किल्ले आणि छत्रपतींचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत.

ज्यावेळी विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न चालू होता, तसेच कलकत्त्यातील डॉक्टर वरील अत्याचारावेळी तुम्ही कुठे होता? कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला. त्यावेळी तुम्ही कुठे होता? अपघाताने पुतळा पडलेला आहे, त्यावर राजकारण करण्याची गरज नाही.या घटनेबाबत राज्यातील जनता विरोधकांना माफ करणार नाही.

विरोधकांनी सातत्याने गलिच्छ राजकारण केल्यामुळे ही बातमी देशभर पसरण्याचं काम करत छत्रपतींच्या अपमान विरोधक करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, हा अपमान छत्रपतींचा असल्यामुळे तुम्हाला जनता सोडणार नाही असा इशारा दिला. या आंदोलनात भाजपचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा:

पुतळा कोसळला, आणि राजकारण तापले……..!

मद्यपी प्रवाशाची बस चालकासोबत झटापट; लालबागमध्ये 9 लोकांना उडवलं

टीम इंडियाला ‘जोर का झटका’, फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त