राज्यातील यंत्रमागधारकांना दिलासा: वीज बिलातील अतिरिक्त सवलतीसाठी नोंदणी अट शिथिल

मुंबई, 2 सप्टेंबर 2024: राज्यातील यंत्रमागधारकांना दिलासा देणारी महत्वाची घोषणा आज राज्य शासनाने केली आहे. वीज बिलात मिळणाऱ्या अतिरिक्त सवलतीसाठी आवश्यक असलेली नोंदणीची अट शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, या निर्णयासाठी सर्व लोकप्रतिनिधी व यंत्रमागधारक संघटनांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महाजन यांनी असेही सांगितले की, आता यंत्रमागधारकांनी वाट पाहायची आहे ती येणाऱ्या वीज बिलांमध्ये ही सवलत 15 मार्चपासून लागू होणार की नाही, याची. या महिन्याच्या 5 तारखेपासून वीज बिले ऑनलाईन उपलब्ध होतील, त्यानंतरच यंत्रमागधारकांना याबाबतची निश्चित माहिती मिळेल आणि त्यांचा जीव भांड्यात पडेल.

या सवलतीमुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक ओझे काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ही वाचा:

वडिलांनी जीवाच्या भीतीने मुलाचा गळा आवळला; गुन्हा दाखल

मनसेचे अनोखे आंदोलन: महाड एसटी स्थानकात गुरे बांधून व्यवस्थापनाविरुद्ध तीव्र निषेध

ठरलं तर मग! जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश