इचलकरंजी – वस्त्रोद्योगाच्या (textile industry)क्षेत्रात नवीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचा प्रयास यशस्वी ठरला आहे. शासनाने 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागांसाठी प्रतियुनिट 75 पैशांची आणि 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागांसाठी प्रतियुनिट 1 रुपयांची वीज सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा अध्यादेश सोमवारी, 2 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला.
आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योगाच्या(textile industry) वीज सवलतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या अथक प्रयत्नांमुळे वीज सवलतीच्या संदर्भातील अध्यादेश प्रकाशित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात या सवलतीची घोषणा केली होती, परंतु नोंदणीची अट रद्द न झाल्याने काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत नोंदणीची अट रद्द करून वीज सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, 15 मार्च 2024 पासून या सवलतीची अंमलबजावणी सुरु होईल. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रातील अनेकांनी समाधान व्यक्त केले असून, वीज सवलतीच्या जीआरच्या त्वरीत प्रकाशनामुळे गोड बातमीचा आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा:
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यासाठी एसटी महामंडळाचे मोठे नियोजन: 5000 जादा बसेस उपलब्ध
सकाळच्या नाश्तासाठी आणि मुलांच्या डब्ब्यासाठी मुगाचा डोसा: एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पर्याय
फडणवीसांच्या सुरत लुटीबाबतच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका: भाजपा-आरएसएसवर गंभीर आरोप