छत्तीसगड: छत्तीसगडमधून धक्कादायक बातमी समोर (family)आली आहे. जांजगीर चांपा जिल्ह्यात काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पंचराम यादव (वय 66) असे या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. पंचराम यादव यांनी आपली पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत सर्वांचा मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यामध्ये(family) पंचराम यादव आणि त्यांचे कुटुंब राहत होते. शनिवारी (30 ऑगस्ट) रात्रीच्या सुमाराम,पंचराम यादव यांनी आपल्या पत्नीसह दोन्ही मुलांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच त्यांना बिलासपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रविवारी सकाळी तिघांचाही मृत्यू झाला. तर पंचराम यादव यांचा मोठा मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. काँग्रेस नेते पंचराम यादव (६६ वर्षे), त्यांची पत्नी दिनेश नंदानी यादव (५५ वर्षे), मोठा मुलगा नीरज यादव (२८ वर्षे) आणि धाकटा मुलगा सूरज यादव (२५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
कर्जबाजारीपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पंचराम यादव जंजगीर नगरपालिकेत कंत्राटदार होते. त्यांनी काही कर्जही घेतले होते. पण कर्ज चुकवता न आल्याने संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते.
धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूपही लावले होते. त्यानंतर घराच्या मागच्या दरवाजाने प्रवेश करून त्यांनी हे टोकाचे पाऊन उचलल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर त्यांच्या शेजारी राहणारी मुलगी त्यांच्या घराकडे आली, फोन करूनही कोणीही दार उघडत नसल्याने त्यांना संशय आला. तिने आजूबाजूच्यालोकांना माहिती दिली. यानंतर शेजारी आणि नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडला त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा:
इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला वीज सवलत, आमदार प्रकाश आवाडे यांचा महत्वाकांक्षी विजय
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितेश कुमारच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह भारताची चमक
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यासाठी एसटी महामंडळाचे मोठे नियोजन: 5000 जादा बसेस उपलब्ध