मुंबई: देशभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागचा राजा’ गणपती मंडळाच्या कार्यकारी (Executive)मंडळात अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
अनंत अंबानी यांच्या या नियुक्तीमुळे ‘लालबागचा राजा’ मंडळाच्या कार्यात अधिकाधिक सहभाग वाढण्याची अपेक्षा आहे. अंबानी कुटुंबाची गणेशोत्सवात दीर्घकाळाची श्रद्धा आहे, आणि दरवर्षी ते लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर, अनंत अंबानींच्या या भूमिकेची विशेष चर्चा होत आहे.
लालबागचा राजा हा गणेशोत्सवात सर्वात महत्त्वाचा आणि भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला गणपती मंडळ आहे. अशा प्रतिष्ठित मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून निवड होणे हे मोठे सन्मानाचे मानले जाते. अनंत अंबानी यांच्या या नियुक्तीमुळे मंडळाच्या प्रतिष्ठेला आणखी बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा:
पोलीस असल्याचे खोटे सांगून खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहर
सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकले रौप्य पदक, माणदेशीच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर तयारी; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका मांडली