नाशिक: एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर (girlfriend)गंभीर आरोप करत स्वतःच्या जीवनाचा अंत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “मी मुलगा आहे, माझं कोण ऐकणार…!” असे भावनिक शब्द लिहित त्याने आत्महत्या केली.
तरुणाने आपली वेदना व्यक्त करणारी एक चिठ्ठी सोडली आहे ज्यात त्याने आपल्या गर्लफ्रेंडवर विविध आरोप केले आहेत. यानंतर त्याने आईला फोन करून तिच्याशी शेवटचे बोलणे केले आणि त्यानंतर जीवन संपवले.
घटनेनंतर पोलीस आणि कुटुंबीयांनी तरुणाच्या चिठ्ठीची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
ही घटना कुटुंब आणि समाजाला हादरवणारी आहे आणि मुलांमध्ये मानसिक आरोग्याची गरज किती महत्त्वाची आहे, यावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा:
गौतमी पाटील कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्यासोबत नाचली” – भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा खुलासा
लाडकी बहिणीच्या फसवणूकप्रकरणी पती-पत्नीस पोलिस कोठडी; आधार कार्ड वापरून ३० बनावट अर्ज दाखल
कोल्हापूरमधून गोव्याला विमानसेवा सुरू; दोन दिवसांच्या मुहूर्ताची घोषणा