देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; 17 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली : देशातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची(rain) प्रतिक्षाच केली जात आहे. असे असताना देशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पूर आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले.

गुजरातमध्ये पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस(rain) राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पावसामुळे मंगळवारी कडाणा धरणाचे 15 दरवाजे १.९२ मीटरने उघडण्यात आले. मही नदीत १ लाख ७७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. महिसागर जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरामध्ये पावसामुळे आलेल्या पुरामुळे गेल्या ७ दिवसात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १७ आंध्रचे आणि १६ तेलंगणातील आहेत. त्रिपुरामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. १९ ऑगस्टपासून सतत पाऊस आणि पुरामुळे ७२ हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपापल्या भागातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी महबुबाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि राज्यभरातील अधिकाऱ्यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितले.

हिमाचल प्रदेशात तुरळक पाऊस झाला. या काळात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. मात्र, कोणीही जखमी झाले नाही. पावसाशी संबंधित घटनांमध्ये या हंगामात आतापर्यंत १५३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशात नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने बाधित भागातील लोकांपर्यंत ड्रोनद्वारे मदत साहित्य पोहोचवले आहे. या ठिकाणी रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा:

गर्लफ्रेंडवर आरोप करीत तरुणाची आत्महत्या; “मी मुलगा, माझं कोण ऐकणार…!”

गौतमी पाटील कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्यासोबत नाचली” – भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा खुलासा

लाडकी बहिणीच्या फसवणूकप्रकरणी पती-पत्नीस पोलिस कोठडी; आधार कार्ड वापरून ३० बनावट अर्ज दाखल