गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त…

गणेशोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातूने आनंदवार्ता दिली आहे. सोन्याच्या(buy gold) किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई आली आहे. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. आज 5 सप्टेंबररोजी देखील सकाळच्या सत्रात घसरण दिसून आली.

महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबररोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या. 4 सप्टेंबररोजी देखील भाव खाली आले. आज सकाळी देखील काही अंशी सोनं(buy gold) स्वस्त झालं. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी देखील उतरली आहे. 1 सप्टेंबररोजी भाव स्थिर होता. 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 71,295, 23 कॅरेट सोने 71,010, 22 कॅरेट सोने 65,306 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट सोने 53,471 रुपये तर 14 कॅरेट सोने 41,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान,वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हेही वाचा:

दोन्ही मुलांचा मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर; अशी वेळ कोणत्याच आई-बापावर येऊ नये!

निवडणुकीआधी महाराष्ट्राची चांदी! ७६ हजार कोटींची गुंतवणूक अन् १२ लाख रोजगार

आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ