आगामी विधानसभा निवडणूक(political consulting firms) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत. कारण राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरा करताना दिसत आहेत. या दौऱ्यादरम्यान मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. अशातच आता राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या(political consulting firms) पार्श्वभूमीवर वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाच्या वेळी मनसे राज ठाकरे उपस्थितीत होते. अगदी त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. यामुळे आता ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांचे खंदे समर्थक असलेले अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
मनसेने वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
वरळी विधानसभेतील अनेक वर्षांपासून सामाजिक काम करणाऱ्या तरुणांनी मनसेमध्ये येण्याची प्रचंड इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या तरुणांनी आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला आहे. मनसे या पक्षात असल्यास लोकांचे काम प्रामाणिकपणे आणि जोमाने करू शकतात अशा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी हा पक्ष निवडला असल्याचं बोलून दाखवलं आहे.
हेही वाचा:
गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का?
मृत्यूशी लढतोय ‘हा’ स्टार क्रिकेटर, ICU मध्ये दाखल
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 10 निर्णय, शेतकऱ्यांसाठी ‘हे’ ठरेल महत्त्वाचे