आपल्यापैकी अनेकांना सतत(Chocolate) चॉकलेट, चिप्स किंवा अन्य जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा होत असते. परंतु, तज्ज्ञांच्या मते, ही केवळ सवय नसून शरीरातील काही पौष्टिक घटकांच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. विशेषतः मॅग्नेशियम, क्रोमियम, झिंक, आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड या घटकांची कमतरता असल्यास शरीर जास्त प्रमाणात गोड किंवा खारट पदार्थांची मागणी करतं.
मॅग्नेशियमची कमतरता असल्यास चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते, कारण चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असते. क्रोमियमची कमतरता रक्तातील साखर संतुलन बिघडवते, ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा वाढते. झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळेही अशा प्रकारच्या अस्वस्थ खाण्याच्या सवयी निर्माण होतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीरात या घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी ताज्या फळं, सुकामेवा, बीन्स, हरीभाज्या यांचा आहारात समावेश करावा. तसेच नियमितपणे पौष्टिक आहार घेऊन आणि संतुलित खाण्याच्या सवयींमुळे अशा तीव्र इच्छा टाळता येऊ शकतात.
हेही वाचा:
‘महायुतीत असलो तरी मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरूच’: अजित पवारांची स्पष्ट भूमिका जागावाटपावर
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे ठाकरे गटाची पाठ फिरवली..
“सशस्त्र दलांनी कायम सज्ज राहावे”: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सतर्कतेचा इशारा