भारतीय क्रिकेटपटू (cricket)रवींद्र जडेजाच्या राजकारणात प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जडेजाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्राथमिक सदस्यत्व घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याची पत्नी रिवाबा जडेजा, जामनगरमधून भाजपच्या आमदार असून, तिने सोशल मीडियावर रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाबद्दलची पोस्ट शेअर करून या चर्चांना आणखी बळ दिले आहे.
रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटपासून विश्रांतीवर असून, त्याच्या दुलीप ट्रॉफीमधून अचानक माघारीमुळे हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे. जडेजा, ज्याने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य कौतुकास्पद म्हटले आहे, आता स्वतःही राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने, रवींद्र जडेजाच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होणार असल्याचे दिसते. त्याची पत्नी रिवाबा देखील भाजपच्या तिकीटावर निवडून आलेली आहे, आणि तिनेही जडेजाच्या सदस्यत्वाचा समाचार घेतला आहे.
जडेजाच्या क्रिकेटमधील कारकिर्दीला आता राजकारणाचे नवे वळण लागले आहे का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!
हेही वाचा:
गणपती बाप्पासाठी तयार करा ‘नो कुक’ नारळ-मावा मोदक;
‘महायुतीत असलो तरी मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरूच’: अजित पवारांची स्पष्ट भूमिका जागावाटपावर