गणपतीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रासाठी (govt)आनंदाची बातमी आहे. राज्यात चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे 1.17 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांमुळे मराठवाडा आणि विदर्भातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा हा निर्णय राज्यातील आर्थिक विकासास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा:
लालबागच्या राजाचा शाही थाट: सोन्याचा मुकूट, आकर्षक पितांबर अन् काशी विश्वनाथ मंदिराची थीम
रवींद्र जडेजाची भाजपमध्ये एंट्री:पत्नी रिवाबाने दिला संकेत!
गणपती बाप्पासाठी तयार करा ‘नो कुक’ नारळ-मावा मोदक;