लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज; 4500 रुपये मिळवण्यासाठी माहिती

राज्य सरकारने (govt)सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता अधिक लोकप्रिय होत आहे, आणि यासंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवीन फॉर्म उपलब्ध झाला असून, अर्जदारांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज भरून 4500 रुपये मिळवता येणार आहेत.

योजना कशी भरणार?
नवीन अर्ज भरण्यासाठी, तुम्ही ladkibahin.maharashtra.go.in या पोर्टलवर जाऊन अर्ज भरू शकता. त्यासाठी खालील पद्धती अनुसरा:

  1. लॉग इन करा: नवीन असल्यास, खाते तयार करा आणि आवश्यक माहिती भरून लॉग इन करा.
  2. आवश्यक माहिती भरा: आधारकार्ड नंबर, पत्ता, वैयक्तिक माहिती आणि बँक खाते माहिती अचूकपणे भरावी.
  3. कागदपत्रे अपलोड करा: आधारकार्डच्या दोन्ही बाजू, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
  4. सबमिट करा: अर्ज पूर्ण करून सबमिट बटणावर क्लिक करा.

सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज रद्द झालेले महिला आणि नवीन अर्जदारांनी ही संधी गमावू नये. अचूक माहिती भरणे सुनिश्चित करा, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवता येईल.

हेही वाचा:

महाराष्ट्रात 1.17 लाख कोटींच्या चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता: 29 हजार नोकऱ्यांची संधी

लालबागच्या राजाचा शाही थाट: सोन्याचा मुकूट, आकर्षक पितांबर अन् काशी विश्वनाथ मंदिराची थीम

रवींद्र जडेजाची भाजपमध्ये एंट्री:पत्नी रिवाबाने दिला संकेत!