राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात(news) छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खोटी माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.शहरातील वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भारतीय न्याय संहिता353(2) अंतर्गत जितेंद्र आव्हाड(news) यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. यानंतर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागे सरकारवर टीका करत सरकारकडे शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. अशात लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राज्याच्या महसूल व वन विभागाकडून मंगळवारी एक परिपत्रक काढण्यात आले. यात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठीच्या तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याचं म्हटलं होतं. अशात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली.
काल (5 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्यात आलेल्या आदेशाबाबत चर्चा झाली. या बैठकीत लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केलं आहे. तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याची माहिती चुकीची असल्याचं देखील सरकारने म्हटलं.
याच निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. त्यांनी सोशल मीडियावर जीआर आणि एक पोस्ट करत सरकारवर टीका केली होती. यावरूनच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले
खाणं-पिणंही झालं अशक्य! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हिना खानला आणखी एक आजार
राइड कॅन्सल करताच रिक्षावाल्याला राग अनावर, तरुणीला कानशिलात लगावले, Video Viral