नागपूर : पत्नीला(wife) शिवीगाळ केल्यावरून संतापलेल्या धाकट्या भावाने थोरल्या भावाची हत्या केली. किसन चौखे (वय 36, रा. मांडव घोराड) असे मृताचे नाव आहे. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी प्रभा विनायक चौखे (वय 50) यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. गोविंद चौखे (वय 25) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रभा(wife) आणि विनायक चौखे यांना किसन आणि गोविंद अशी दोन मुले आहेत. दोघेही विवाहित आहेत. एकाच घरात परंतु वेगवेगळे राहतात. आई-वडील आणि दोन्ही मुले शेतमजूर म्हणून काम करतात. किसनला दारूचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत नेहमीच कुटुंबीयांशी भांडत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास किसन आणि गोविंद यांच्यात वाद झाला. वाद उफाळल्याने संतापाच्या भरात किसनने गोविंदच्या पत्नीला अश्लील शिविगाळ केली.
पत्नीला शिविगाळ केली म्हणून गोविंदही संतापला. त्याने किसनला खाली पाडून पोट, छाती, आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. किसनला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी गोविंदला अटक केली.
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता पत्नीला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या भावाने थेट भावालाच संपवलं.
हेही वाचा:
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
खाणं-पिणंही झालं अशक्य! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हिना खानला आणखी एक आजार
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा हट्ट का? ठाकरे गटाने नेमके काय साध्य केले… राजकीय वर्तुळात चर्चा