“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे गटाचे नेते (political)आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून रामदास कदम उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. आताही एका मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केले.

बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री(political) करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. म्हणून त्यांनी मला मुद्दाम गुहागर येथून उभं केलं. मी दापोली मतदारसंघ मागितला होता. मात्र काही नेत्यांना सांगून, राजकारण करून उद्धव ठाकरेंनी मला पाडलं, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी माझ्यासहीत नारायण राणे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून कारवाया केल्या. उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्वाकांक्षेपायीच आज शिवसेना फुटली आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मला देण्यात आली होती. परंतु, मी विरोधी पक्षनेता व्हावं असे उद्धव ठाकरेंच्या मनातच नव्हतं. त्यामुळेच त्यांनी मला शेवटपर्यंत पत्र न देण्याची भूमिका घेतली. गजानन किर्तीकर स्वतः या गोष्टीला साक्षीदार आहेत. मनोहर जोशी सुद्धा त्यावेळी तिथेच उपस्थित होते.

या प्रकरणात नंतर बाळासाहेबांनीच हस्तक्षेप केला. त्यांनी सांगितल्यानंतरच मला नियुक्तीचं पत्र दिलं गेलं. मला जे काही दिलं ते बाळासाहेबांनीच दिलं. पण उद्धव ठाकरेंचं धोरण म्हणजे एखादं खातं द्यायचं आणि बाजूला बसवायचं असं होतं. 2009 मध्ये मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता होता.

विरोधी पक्षनेता म्हणून बाळासाहेब मुख्यमंत्रि‍पदासाठी कदाचित माझंच नाव पुढे करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटत होती. त्यामुळे त्यांनी मला मुद्दाम गुहागरमधून उभं केलं. मी दापोली मतदारसंघ मागितला होता. यानंतर काही नेत्यांना सांगून राजकारण करून उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. मला गुहागरमधून पाडण्याचं पाप उद्धव ठाकरेंनीच केलं असा आरोप रामदास कदम यांनी केला.

अमित शाह यांनी जर तुम्हाला भिंतीच्या आड मुख्यमंत्रिपदाबाबत सांगितलं होतं तर बाहेर आल्यावर पत्रकार परिषदेत तुम्ही का सांगितलं नाहीत. तुमच्यासमोरच अमित शाह सांगत होते की पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर मग त्यावेळी तुम्ही त्यांना का थांबवलं नाहीत असे सवाल त्यांनी केले.

मी उद्धव ठाकरेंना जवळून अनुभवलं आहे. फक्त मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहेत. राज्याच्या हिताच्या कोणत्याही गोष्टी त्यांच्याकडे नाहीत. उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे दिसतात तितकेच ते लबाड आहेत. शरद पवार काय आहेत हे लवकरच त्यांना समजेल, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.

हेही वाचा:

आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!

हॉर्नच्या आवाजावर लहान मुलांनी केला डान्स: Video Viral

मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत यांमध्ये तीव्र वाद; फडणवीसांवर गंभीर आरोप