6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी करत असतानाच…; Video

रील(reel) बनवण्यासाठी आजचे तरुण काय करेल याचा काही नेम नाही? अनेकजण चालत्या ट्रेनमधून उडी मारतात तर काही जण उंचावरून उडी मारतात. तरुणांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही. रील बनवताना अनेक तरुणांचा मृत्यू होतो, असे अनेक अहवाल समोर येतात. आता असाच एक प्रकार समोर आला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. तेलंगणामध्ये 20 वर्षीय तरुणाने रील बनवताना तोंडात कोब्रा ठेवला. रील बनवण्याच्या नादात त्याने केलेला हा जीवघेणा प्रकार त्याच्याच जीवावर बेतला आहे.

तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात ही दुर्दैवी धक्कादायक घटना घडली आहे. येथील देसाईपेठ गावात राहणारा मोची शिवराज हे वडील गंगाराम यांच्यासोबत साप वाचवण्याचे काम करायचे. एक नाग परिसरात आला. गावकऱ्यांनी गंगारामला पकडण्यासाठी बोलावले.

शिवराजने वडिलांकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दोघेही गावात पोहोचले आणि येथून एका नागाला पकडले. हा नाग 6 फूट लांब होता. कोब्राला पकडल्यानंतर शिवराजने त्याच्यासोबत फोटोशूट केले. यादरम्यान त्याने कोब्राचे तोंड तोंडात घातले आणि हात जोडून उभा राहिला. आणि पुढे घडलेला संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात(reel) कैद झाला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शिवराज यांनी कोब्रा तोंडात घेतल्याचे दिसत आहे. तो कोब्राला तोंडात स्टाईलने लटकवतो. त्यानंतर तो हात जोडतो. स्टायलिशपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि अंगठ्याचे थम्स अप करताना दिसतो. यावेळी त्याचा मित्र मोबाईलवरून व्हिडिओ शूट करत आहे. अचानक सापाने त्याला दंश केला.हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा:

हे गणराया, त्यांना सुबुद्धी दे!

आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!

“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट