कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, ड्युटीवरील पोलिस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सूजला

कोल्हापूर : कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीलाच एचडी लाईट्स(laser) आणि डीजेच्या दणदणाटाने कान, डोकं बधीर होण्याची वेळ आली. उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युतझोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने तरुणाचा डोळा लाल झाल्याची घटना घडली.

डोळ्यातून पाणी वाहू लागल्यानंतर संबंधित तरुणाला शास्त्रीनगरमधील एका खासगी रुग्णालयात आणले असता त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा होऊन आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे(laser) त्रास जाणवू लागला होता. त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान, कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले. कोल्हापूर हे असं शहर ज्या शहरात आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक देखील मोठ्या उत्साहात काढली जाते. राजारामपुरी परिसरातील 54 हून अधिक गणेश मंडळं या आगमन मिरवणुकीत सहभागी होतात. ही आगमन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठी गर्दी करतात.

दुसरीकडे, नव्या राजवाड्यात चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने श्री गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पालखीतून आणलेल्या या मूर्तीचे खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पूजन केले. राजवाड्यात विधिवत श्रींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर याज्ञसेनीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती आणि यशराजराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. पापाची तिकटी येथून राजवाड्यातील गणेशमूर्तीचे पालखीतून आगमन झाले. घोडेस्वार अग्रभागी होते तर शाही दंड हाती घेतलेल्या मानकऱ्यांचा शाही लवाजमा पालखीसोबत चालत राजवाड्यावर आला.

हेही वाचा:

हे गणराया, त्यांना सुबुद्धी दे!

6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी करत असतानाच…; Video

“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट