मनोरंजनसृष्टीतून(entertainment news) धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक जगाचा निरोप घेतलाय. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचं निधन झालंय. हृदय विकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.
अभिनेत्याच्या (entertainment news)मागे आता त्याची पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत. सर्वजण कुटुंबाला स्टॉंग राहण्यास सांगत असून अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
कमी वयातच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंब, मित्र-परिवार आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्याने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’सह अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.
विकास सेठीने अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिवानापन’ मध्ये काम केलं होतं. बॉलीवूडच नाही तर तेलुगू हिट ‘आयस्मार्ट शंकर’मध्येही त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती.
विकास सेठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. अभिनेता कायम पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने दुःख व्यक्त केलं जात आहे. तो नच बलिए या डान्स रिॲलिटी शोमध्येही झळकला होता.
हेही वाचा:
‘मुख्यमंत्री योजनादूत’ 50 हजार तरुणांना देणार रोजगार
मोठी बातमी! गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट
दोन वर्षात ६०० निर्णय घेतले, पण ‘लाडकी बहीण’ योजना आली अन्… CM शिंदेंच्या भाषणाची जोरदार चर्चा!