अनेकदा सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ(Video) पहायला मिळतात. असे व्हिडीओ पाहून अनेकदा थरकाप उडतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा रस्त्यावरून चालताना पाळीव प्राणी मागे लागतात. सहसा कुत्रा, बैल, शेळी यांसारखे प्राणी मागे लागतात. जर या प्राण्यांनी कोणतीही दुखापत केली तर जीव धोक्यात येऊ शकतो. हा व्हिडीओ देखील असाच आहे. एका बैलाने दुचाकीस्वाराला धडक दिली आहे.
अनेक राज्यांमध्ये भटके बैल रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर हल्ला करतात तर कधी आपापसात भांडतात तर कधी माणसांवर हल्ला करतात. आता असाच एक भितीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अनियंत्रित बैल दुचाकीस्वाराला धडकला. बैलाने धडक तर दिलीच पण त्याने दुचाकीस्वारालाही तुडवले. धडक इतकी जोरात होती की, तो जोरात खाली आदळतो.
हा व्हिडीओ(Video) कुठचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडिओ शेअर करून लोक इतरांना सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. एक स्कूटरस्वार गर्दीच्या भागातून निघून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात एक बैल त्याच्या दिशेने आला आणि त्याने त्याला पकडले.
स्कूटर चालवणारा मुलगा जमिनीवर पडला. बैल तसाच त्याला चिरडत पुढे सरकला. व्हिडिओमध्ये दोन बैलांमध्ये मारामारी सुरू असल्याचे दिसत आहे. एक बैल पळू लागला तेव्हा समोरून स्कूटरवर एक व्यक्ती पोहोचली. बैलाने एवढ्या जोरात धडक दिली की, स्कूटर चालवणारा व्यक्ती खाली पडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि अशा प्राण्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे की, बैल दिसताच त्यापासून दूर जाणे चांगले. एकाने लिहिले की, बैलांच्या समस्येवर तोडगा काढणे खूप महत्त्वाचे आहे, लोकांना रस्त्यावर येणे कठीण झाले आहे.
तर आणकी एकाने लिहिले की याला चालता मृत्यू म्हणा किंवा आणखी काही… पण याला आपणही जबाबदार आहोत. त्यांची जागा आपण हिसकावून घेतली, आता ते कुठे जाणार? तर ही एक भयानक परिस्थिती आहे परंतु जबाबदारी प्रथम आपली आणि आपल्या शेतकरी बांधवांची आहे. त्यांना रस्त्यावर मरायला किंवा मारायला का सोडले जाते? असेही एकाने लिहिले आहे.
हेही वाचा:
भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्…
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट आली समोर! सुप्रीम कोर्टाने दिली निर्णयाची ‘ही’ तारीख
विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का! माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी