गौतमी पाटीलनं ‘लिंबू फिरवला’, नव्या गाण्यांची चाहत्यांना भुरळ

नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचं नवं गाणं(new songs) रिलीज झालं आहे. गौतमी पाटील ‘लिंबू फिरवला’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आगामी लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटातील ‘लिंबू फिरवला’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून गौतमी पाटील एका नव्या अवतारात पाहायला मिळत आहे.

लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटातील लिंबू फिरवला हे आयटम साँग प्रदर्शित करण्यात आलं आहे. रिलीज होताच या गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. वैशाली सामंत हिच्या आवाजातील हे गाणं(new songs) फारच ट्रेंडमध्ये आलं आहे. वैशाली सामंतच्या आवाजाची जादू आणि गौतमी पाटीलचे ठुमके यांचा संगम या गाण्यात पाहायला मिळत आहे. अमितराज याने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात गौतमी पाटीलसोबत अभिनेता अमेय वाघही डान्स करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असं नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि जुई भागवत झळकणार आहेत. ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणारी जुई भागवत ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई भागवत एक उत्तम नर्तिका आणि गायिका असून आता ती चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 18 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा:

भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्… 

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट आली समोर! सुप्रीम कोर्टाने दिली निर्णयाची ‘ही’ तारीख

बैलाने दुचाकीस्वाराला दिली धडक; मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात बचावला, व्हिडिओ व्हायरल